साके प्रतिनिधी ः सागर लोहार
साके ता,कागल येथील ग्रामपंयातीमार्फत गावात वृक्षांचे रोपन साके-सावर्डे रस्ता ,ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात महिला संरपंच सैा.शिला तानाजी चैागले यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक शुभांगी पुरेकर यांनी गावातील शेतकरी महिलांना सोबत घेवून गावात वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून शेकडे जंगली वृक्षांची लागवड केली असून या वृक्षांचे संगोपण देखील चांगले करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाच्या एस आर तब्बलजी, शेतकरी महिला महिला सारिका चौगले, सविता चौगले, आक्कताई गिरी ,सुरेखा चौगले पुनम चौगले तानाजी चौगले,मारुती पाटील,तेजस्विनी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.
फोटो ः साके ग्रामपंयातीमार्फत वृक्षारोपण करतांना सरपंच सैा.शिला चैागले, एस.आर.तबलजी,ग्रामसेविका शुभांगी पुरेकर सारिका चैागले आदी.महिला छाया ः सागर लोहार,साके