**. आरिफ़ पोपटे कारंजा :
संपूर्ण भारतात सध्या कोरणार आजाराने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बागित रुग्णांच्या मदतीसाठी विविध संघटना, सामाजिक संस्था ,व्यापारी संघटना,पञकार संघटना काम करत आहे .पण कारंजा लाड येथील एका मुलाने आपल्या वडिलांची मृत्यूनंतर समाजाचा रीतीरिवाज बाजूला सावरून त्यावर होणारा खर्च न करता 41 हजार रुपयांचा चेक कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांना सुपूर्त केला .सविस्तर माहिती अशी की भामदेवी येथील मुंदे कुटुंबातली राजकमल काशिरामजी मुंदे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी पंचायत समिती कारंजा यांचा मृत्यू दिनांक 26/ 6/ 2020 ला दीर्घ आजाराने झाला. त्यांचा मुलगा दिलीप मुंदे व भाचा ब्रह्मदेव बांडे यांनी समाजाच्या रितीरिवाज बाजूला ठेवून तेरवि व इतर कार्यक्रम न करता पत्रकार विचारपीठ च्या माध्यमातून हा उपक्रम राबवित पंतप्रधान covid-19 सहायता निधी 11 हजार रुपये ,मुख्यमंत्री covid-19 सहायता निधी 31 हजार रुपयाचा चेक कारंजा तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ चे तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव बांडे, दैनिक मातृभूमी चे पत्रकार किरण शार शिवसेनेचे गणेश बाबरे, गणेकर ,जिचकार के न्यूज चे पत्रकार सुरेश फुलमाळी व दिलीप मुंदे हे उपस्थित होते.