*प्रतिनिधी सतिश लोहार*
शिरोळ तालुक्यातील अ . लाट या गावामध्ये ग्रामपंचायत प्रशासन ,आपत्ती निवारण समिती आणि गणेश मंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ,
सध्या सगळीकडे कोरोना कोवीड १९ या विषाणुमुळे सगळीकडे वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे , या परिस्थितीचे सामाजिक भान ठेवुन हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला,
अ.लाट ग्रामपंचायतीच्या पटांगणात गणेशोत्सव 2020 बाबत विचार विनिमय करण्यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे स . पोलीस .नि. विकास अडसुळ आणि बिट अंमलदार अविनाश मुंगसे यांनी गावातील सर्व गणेश मंडळाचे प्रतिनिधी,आपत्ती निवारण समिती,गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक घेऊन कोरोना च्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत आवाहन केले, या आवाहनाला प्रतिसाद देऊन या आपत्तीच्या पार्श्वभुमीवर गावात एक गाव एक गणपती ची संकल्पना राबवुन एक आदर्श निर्माण करण्याचा निर्णय एकमुखाने करण्यात आला.
यावेळी सरपंच पांडुरंग मोरे भाट ,उपसरपंच मिलिंद कुरणे यांचेसह डॉ,दशरथ,काळे,संजय आवळे,शरद पाटील,सतीश कुरणे,डी बी पाटील सर,रमेश ठिकने ग्रा,प,सदस्य स्वप्नील सांगावे,प्रमोद कांबळे, दादासाहेब कोळी,निलेश कांबळे,शीतल वाटेगावे,शीतल कुरणे आख्तर मकानदार,पत्रकार दगडु कांबळे यांचेसह विविध गणेश मंडळाचे कार्यकर्ते,मोठया संख्येने उपस्थित होते, ही बैठक सोशल डिस्टिंगशन,पाळत ग्रामसचिवलाय समोर संपन्न झाली.