*
रजनिकांत वानखडे
वाशिम प्रतिनिधी
सोनाळा येथील मुख्य रस्त्याला असलेल्या पुलांची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे
सोनाळा येथील अडान नदीवर सोनल प्रकल्पाची निर्मिती झाली असून त्याच आडान नदीवर प्रकल्पाची निर्मिती झाली व सोनाळा प्रकल्पाचे वेस्टेज पाणी हे नदीवरून काढण्यात आले असुन सदर नदीला मोठा पुर येत असुन पुलांची उंची कमी असल्यामुळे पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने सोनाळा येथिल ग्रामस्थाना ये-जा करता येत नाही गांवाच्या मागच्या बाजुला सोनाळा प्रकल्प आहे व आजु बाजुला प्रकल्पाचा सांडवा असुन संपुर्ण गांवाला पाण्याचा वेडा असुन गांवाला एकमेव एकच रस्ता असुन त्यापुलावरुन सुध्दा ये जा करता येत नसल्यामुळे संपुर्ण गांवाची कोंडी होते कोणत्या आजारी असलेल्या व्यक्ती ला उपचारासाठी पूलावरुन पाणी कमी होईपर्यंत थांबावे लागतो तरी संबंधित लोकप्रतीनिधी यांनी याकडे लक्ष देवुन गावाची मोठी समस्या दुर करण्याची मागणी ग्रामस्था कडून होत आहे