Monday 20 July 2020

mh9 NEWS

आयुष भारत नोंदणीकृत सदस्य डॉक्टरांवर कारवाई केली तर गप्प बसणार नाही : आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी




सोलापूर : अल्टरनेटीव्ह मेडीसिन नॅचरोपॅथी मेडीसिन कम्युनिटी मेडीकल अ‍ॅन्ड इसेंन्शीयल ड्रग्स इलेक्ट्रो होमीओपॅथी पात्रता डॉक्टर्स हे मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठातून रितसर पदवी घेवून वैद्यकिय व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे कायदेशिररित्या व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांवर कार्यवाही करु नये अशी मागणी आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी केली असून त्यासंदर्भात 17 जुलै रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अतिशय दुर्गम भागात अतिआवश्यक असलेली रुग्णसेवा हे डॉक्टर्स देत असतात. पण काही विघ्नसंतोषी घटक या डॉक्टरांना ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करतात. वास्तविक पाहता, अल्टरनेटीव्ह मेडीसिन नॅचरोपॅथी मेडीसिन कम्युनिटी मेडीकल अ‍ॅन्ड इसेंन्शीयल ड्रग्स इलेक्ट्रो होमीओपॅथी पात्रता डॉक्टर्स हे मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठातून रितसर पदवी घेवून वैद्यकिय व्यवसाय करीत आहेत. मात्र तक्रार धारक व्यक्तींना या बाबीचे पुरेपुर ज्ञान नसल्यामुळे सदर व्यक्ती केवळ डॉक्टर्स मंडळींना लुबाडण्याच्या हेतूने त्यांना पैशाच्या रुपाने खंडणी मागतात. डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्यास त्यांच्याविरुध्द खोटे तक्रार अर्ज पोलीस प्रशासनाला दिले जातात. अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडूनही डॉक्टर्सच्या पदव्यांची किंवा तक्रारींची काहीही शहनिशा न करता डॉक्टर्सवर एकतर्फी कारवाई केली जाते. मात्र वरील पात्रता धारक डॉक्टर्स हे मान्यताप्राप्त संस्था व विद्यापीठातून पदवी घेतलेले आहेत. यासदंर्भात मा. सर्वोच्य न्यायालयाने निकाल दिलेले आहेत. तरी आपण खोट्या तक्रारींची पुर्णपणे शहानिशा करुनच कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत तसेच खोट्या तक्रारी करणार्‍या इसमांवर योग्य ती पोलीस कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे. अशी मागणी आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगत होते.

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :