हेरले / प्रतिनिधी
दि.31/7/20
मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील बालावधूत हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९२.९५ टक्के लागला.
बालावधूत हायस्कूल मधील साक्षी तानाजी थोरवत हिने ( ९६.२०) टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. तर साक्षी संभाजी मगदूम हिने ( ९४.४०) टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तुषार तानाजी घुगरे याने (८९.२०) टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
यशस्वी विद्यार्थ्याना संस्थेचे अध्यक्ष बी .बी.कराळे , सचिव एस् .एस्. चौगुले , माजी मुख्याध्यापक व संस्थापक सचिव एस .एस. चौगुले , मुख्याध्यापक एस .ए. चौगुले , संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .