पट्टणकोडोली (साईनाथ आवटे)
पट्टणकोडोली
जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून ज्या समाज सेवकांनी कोविड - १९ या राष्ट्रीय आपत्तीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेची सेवा व जनजागृती केली आहे. अशा समाज सेवकांचा संस्थेमार्फत "कोविड योध्दा " हे सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहीती फौंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ. शोभाताई शिंदे यांनी दिली.
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, अशोक सातपुते, जिल्हापरिषद सदस्य स्वप्निल आवाडे, ग्रामपंचायत सदस्य राजू मगदूम, डॉ.सनतकुमार खोत, डॉ. रिझवाना बोरगावे, कार्यकारी अभियंता बाबासाहेब शिंदे, सहाय्यक अभियंता अनिल शिंदे, आरोग्य सेवक अमर पाटील, पोलीस पाटील मोहनकुमार वर्धन यांच्यासह २४ समाज सेवकांना सन्मानित करण्यात येणार असल्याचेही सौ. शोभाताई शिंदे यांनी सांगितले.
या पत्रकार बैठकीस उपाध्यक्ष सुनिल कांबळे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शरद नारकर, जिल्हाध्यक्ष युवराज पोवार, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. शोभा महाजन, बाबुराव मगदूम, बी.आर. महाजन, आप्पासाहेब पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोअर कमिटीचे सदस्य शिरीष शिंदे यांनी आभार मानले.
फोटो :- पट्टणकोडोली........ येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना फौंडेशनच्या महिला अध्यक्षा सौ. शोभाताई शिंदे