उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर येथील महात्मा पबलिक स्कुल येथे लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड व अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीर तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या वाढदिवसाचे ओचीत्य साधुन त्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.उपस्थित माण्यवराचा हस्ते प्रमाणपत्र शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड अध्यक्षा संगीता नेत्रगावे, मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिजीत औटे, लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड कोशाध्यक्ष वर्षारानी धावारे, बोर्ड ऑफ डायरेक्ट प्रेमलता नळगीरे, लॉयझन ओफिस उषा माने, मधुमती कनशेट्टे, पि आर ओं चंचला हुगे, सदस्य गुलनाज पठाण खान, लक्ष्मी पांचाळ, हे उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धावारे यांनी परिश्रम घेतले.सर्व माण्यवर सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.