उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा शाळेच्या नवीन वस्तूचे उदघाटन व डोंगर शेळकी केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवनिवृत्तीच्या निमित्ताने सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलभैया केंद्रे म्हणाले की, सद्या जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत आहे,अगोदरच्या तुलनेत शाळांच्या पटसंख्येत चांगली वाढ झालेली आहे.हे आपले सर्वांचे यश आहे,पण एवढ्यावरच आपणाला थांबायचं नाही,तर शंभर टक्के शाळा डिजिटल,व प्रगत झाल्या पाहिजेत,शिक्षक व विद्यार्थी तंत्रस्नेही बनले पाहिजेत, आणि जिल्हा परिषदेचा गुणवत्तेचा लातूर पॅटर्न अधिक गतिमान बनला पाहिजेत असे मत राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. डोंगर शेळकी केंद्राचे केंद्रप्रमुख बालाजी गुरमे,केंद्रीय मु अ एन व्ही मठपती,जि प खेर्डा येथील सह शिक्षक एल एस मुंढे,जि प सुकणी येथील मु अ शोभाताई बरूरे मॅडम, या सर्वांचा शाल श्रीफळ,व भर आहेर देऊन केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदरील कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून हिप्परगा गावचे सरपंच रत्नमालाताई चव्हाण हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि प सदस्य विजयाताई बिरादार,हणमंत शेळके,पंचायत समिती देवणीचे गटशिक्षणाधिकारी संजय पारसेवार हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी निती लोहकरे,भोईनवाड सर,केंद्रप्रमुख येडले मॅडम,रोडगे सर,एस पी मुंढे,अ बा शिंदे,एम आर मुंढे,पुंड डी आर, गुरमे डी पी,पुण्य नगरीचे पत्रकार गणेश मुंढे,धनंजय गुडसुरकर,केंद्रातील घटक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,हिप्परगा गावातील लोकप्रतिनिधी,शाळा व्यवसथापन समिती सदस्य,व पालक उपस्थित होते. सदरील कार्यक्रमात एस पी मुंढे,डी पी गुरमे,ज्ञानोबा मुंढे,बाबुराव मुंढे,कांबळे सर,जि टी मुंढे,पाटील सर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी सोसियल डिस्ट्न्सिंगचा वापर करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मनोज मुंढे यांनी केले,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषयसाधन व्यक्ती श्री. ज्ञानोबा मुंढे यांनी केले.तर आभार एस पी मुंढे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिप्परगा शाळेचे मु अ मनोज मुंढे,वर्षाताई राठोड मॅडम नरसन घुळे सर,एस पी मुंढे,सरपंच,उपसरपंच,पोलिस पाटील,शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य,पालक व ग्रामस्थ यांनी सामाजिक अंतर पाळून प्रयत्न केले.