सैनिक टाकळी प्रतिनिधी
गतवर्षीचा महापूर पाहता शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा व आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी सैनिक टाकळी येथे केले ते सैनिक टाकळी येथील पिक पाहणी दरम्यान बोलत होते. शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या राष्ट्रीकृत बँक अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत विमा हप्ता भरावे असे आवाहन केले, भुईमूग पिकासाठी शेतकरी हिस्सा पीक विमा हप्ता हेक्टरी ७०० रुपये असून विमा संरक्षित रक्कम ३५००० इतकी आहे तर सोयाबीन साठी विमा हप्ता रक्कम हेक्टरी ९०० असून विमा संरक्षित रक्कम ४५००० इतकी आहे.विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै हि आहे असे ते म्हणाले .
तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी नगदी पिकाकडे लक्ष दिल्याने भुईमूग सारख्या पिकाचे क्षेत्र वाढले आहे तालुक्यांमध्ये सोयाबीन ६१४ हेक्टर ,भुईमूग सुमारे १९९९ हेक्टर, भात ४६ हेक्टर ,मूग ११० हेक्टर ,उडीद ३२६ हेक्टर असे क्षेत्र लागवडीखाली आली आहे. तालुक्यातील शंभर टक्के पेरणी पूर्ण झालेल्या आहेत.दरम्यान तालुक्यातील सर्व गावामध्ये कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम निमित्त सोयाबीन , भुईमूग , मूग , उडीद या पिकांचे बियाणे उगवण चाचणी घरचे घरी कसे करावे तसेच या सर्व पिकांच्या बियाणांची बीजप्रक्रिया या बाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह माहिती देणेत आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी त्यांचे सोबत मंडळ कृषी अधिकारी श्री निरंजन देसाई कृषी सहाय्यक जयपाल बेरड , विश्वास गुरव उपस्थित होते.