नंदुरबार- प्रतिनिधी - वैभव करवंदकर
नंदुरबार रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पंकज पाठक तर सचिवपदी आर्किटेक्ट निरज देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या ५३ वर्षापासून रोटरी क्लब सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्य करीत आहे. यंदा रोटरी क्लब ५४ व्या वर्षात पदार्पण करीत असून या २०२०-२१ वर्षासाठी नंदुरबार रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी पंकज पाठक तर सचिवपदी आर्किटेक्ट निरज देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. आतापर्यंत रोटरी क्लबतर्फे महिला सबलीकरण, विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, युवक व युवतींसाठी व्यक्तिमत्व विकास, व्याख्यानमाला, स्वच्छ साक्षर व समृध्द शहरासाठी जनजागृतीपर भव्य सायकल रॅली, गरिबांसाठी मोफत आरोग्यशिबीर, हदय शस्रक्रिया व उपचार शिबीर, अल्पदरात आरोग्य तपासणी, डायलिसीस, एक्स-रे, सोनोग्राफी तपासणी व सुविधा, नगरपालिकेच्या सहाय्याने रोटरी क्लबने उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याचप्रमाणे येणार्या वर्षात कोरोना आजारावर मात करण्यासाठी विशेष करुन नगरपालीका व मा.आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या सहाय्याने आरोग्य सुदृढता व आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये हायजीन अवरनेस कार्यक्रम, इ. लनींग व हॅपी स्कूल, शाळांमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन वाटप, वॉटर सॅनीटायझेशन, महिलांसाठी मेमोग्राफी कॅम्प, सायक्लोफन, धमालगल्ली यासारखे उपक्रम तसेच विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे येणार्या आगामी वर्षापासून पुढील काही वर्षासाठी Education for all through T-E-A-C-H Programme, E Learning द्वारे केंद्र सरकार व रोटरी इंडियाच्या माध्यमातुन (RIHF d NCRT on E Learning Content telecast) इ. पहिली ते बारावी साठी NCRT TV चॅनल च्या माध्यमातुन विद्यार्थ्यांपर्यत पोहचविणार आहेत. तसा ठराव करण्यात आलेला आहे. हे सर्व उपक्रमात रोटरी क्लब, नंदुरबार राबविणार आहे.