डोंगरशेळकी प्रतिनिधी:-
मराठवाड्याचे प्रतिपंढरपुर म्हणुन ओळखले जाणारे तिर्थक्षेत्र श्री समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान डोंगरशेळकी ता उदगीर येथील आषाढी एकादशीला दर्शनासाठी भावीकांची मोठी गर्दी होत असते.या एकादशीला महापुजा महंत अनिल महाराज यांच्या हस्ते पहाटे 5:00 वा. झाली.मंदिरात किंवा मदीर परिसरात भावीकांना व गावातील नागरीकांना येण्यासाठी बंदी होती.ही एकादस भावीकासांठी खुप म्हतवाची असते म्हणून भावीक दर्शनासाठी खुप गर्दी करत असतात भावीक पंचक्रोशी सह शेजारील राज्य कर्नाटक,आंध्र प्रदेश,तेलंगणा या राज्यातून श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात.
तरी जागतिक कोरोणा या महामारी आजाराच्या भितीपोटी भावीकांची काळजी लक्षात घेता मंदीर संस्थान च्या वतीने व प्रशासनाच्या वतीने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने व संस्थान ने घेतला होता भावीकांनी या एकादशीला कोणीही घराच्या बाहेर न पडता घरी राहुन आपली व आपल्या परिवारांची पण काळजी घ्यावी असे संस्थान च्या व प्रशासनाच्या वतीने अव्हाण ही करण्यात आले होते.या अव्हाणाला भावीकांनी प्रतिसाद देत गजेर पापाकडे टाळ मृदंगाच्या आवाजात नाचत गाजत माऊली तुकाराम म्हणत जाणारी मोजकी वारकरी दिसुन आले हे पहील्यांदा सर्वात मोठे दु:ख भावीकांना झाले. व मंदिर परिसरात वाढवणा पोलीस ठाणे अंतर्गत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.