उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
उदगीर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आहो-रात्र आपल्या प्रयत्न करत असलेले आपली एक कोरोना योद्धा ही आगळी वेगळी सर्व सामाण्य नागरीकांमध्ये ओळख निर्माण करणारे प्रशासनातील कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी उदगीरचे तहसीलदार व तालुका दंडाधिकारी व्यंकटेश मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व राष्ट्रवादी युवक काँग्रेस उदगीरच्या वतीने व्यंकटेश मुंडे यांचा कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह,शाल,पुष्पहार,व नारळाचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिकांना मास्क चे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सरचिटणीस अजीम दायमी, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड,प्रा.श्याम डावळे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील,धनाजी बनसोडे,प्रा.मदन पाटील,शिवाजीराजे केंद्रे,सेवादलाचे शहराध्यक्ष युवराज जोमदे, सिद्धार्थ सुर्यवंशी,भिम सुतार,विष्णुकांत राजगौंड,शिवाजी चंडकापूरे,रविंद्र सोमवंशी,रणजित कांबळे व नागनाथ डोंगरे अदी पदाधिकारी उपस्थित होते.