पट्टणकोडोली (साईनाथ आवटे)*
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू केली सर्व लघु,सूक्ष्म, मध्यम आणि मोठे उद्योगधंदे बंद झाले, खाजगी-शासकीय कर्मचारी घरी बसून राहिले,याचा शहरी आणि ग्रामीण भागाला मोठा आर्थिक फटका बसला,जनता आर्थिक संकटात असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून तीन महिन्याचे एकत्र आणि वाढीव विजबील आल्याने जनतेत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेऊन लॉकडाऊन काळातील संपूर्ण विजबील माफ व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी,पट्टण कोडोली शहर यांचेवतीने आज मंगळवार दि.30.06.2020 रोजी सकाळी 11 वाजता पट्टण कोडोली MSEB अभियंता रवींद्र कांबळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.लाईटबिल माफ न झालेस भारतीय जनता पार्टीने आंदोलनाचा इशाराही सदर निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे श्री.सिद्राम माडग्याळ, परशराम डावरे,नंदकुमार कीर्तिकर, सचिन पणदे,विठ्ठल अंगारे,आदिलशहा मुल्ला,सुहास तोडकर,प्रदीप मिरजकर,तुळशीदास लूमनाक,शंकर भाणसे,विकास बिरांजे,संतोष नेर्लेकर, संदीप माळीसर,पोपट भोसले, संजय देवबा,सतीश कागले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.*