प्रमोद झिले: हिंगणघाट वर्धा
युगे अटठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाच्या भेटी परब्रम्ह आलेगा
चरणी वाहे भिमा उद्धारी जगा
1जुलाई रोज बुधवार आषाढी एकादशी.आपण सर्व लहान मोठ्याचे आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा विठूराय.
पांडूरंग दोन्ही हात कमरेवर ठेवून युगान युगे उभा आहे.बाजुला रुक्मिणी माता ही उभी आहे.जशी जशी आषाढी एकादशी जवळ येवू लागते तशी तशी भक्तांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागते.भक्त मंडळी आपल्या सोयीनुसार पांडूरंगाकडे लक्ष ठेवून असतो.काही भक्त मंडळी आपल्या परीसरातील मंदिरात उत्सव सोहळा साजरा करतात
'भेटी लागे जीवा लागलीसे आस'
या आवडीने चरणनासी ठाव घ्यावा हे एकच मागणे प्रत्येकाचे.
तसे पाहता आपले आई-वडिल हेच खरे दैवत आहे भक्त पुन्ड़लिकाने आपल्या वृध्द आई वडिलाची सेवा केली, तेव्हा विठठल परमात्मा स्वत: हून त्याच्या भेटीसाठी आले.तेव्हा भक्त पुंडलिकाने सांगितले देवा मी माझ्या आईवडिलांची सेवा करीत आहे.तो पर्यंत तु उभा राहा असे म्हनून देवाकडे वीट फेकली तोच विटठल परमात्मा आज युगानूयुगे विटेवर उभा आहे.म्हनुन युवकांनी घरीच वृध्द आईवडिलांची सेवा करणे म्हणजे पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी जाण्या सारखेच आहे.
जगतगुरु श्री. संत तुकाराम महाराज म्हणतात 'तुका म्हने माय बापे अवघी देवाचीच रुपे.
वन्द्नीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज अभंग गाथेमध्ये आवर्जुन सांगतात
'आई बाप दोन्ही माना देवासम ||
तयापायी प्रेम देवोनीया |
तयाच्या प्रसादे पावले या जगा ||
लहानाच्य अंगा मोठे केले |
विद्या शीकवोनी लाविलया मार्गी||
नाहितर सांगा काय होते?
तुकड्यादास म्हने फेडावे हे कर्ज
उभारावा ध्वज किर्ती रुपे.
श्री. गजानन भाऊ वानखेडे
मु.पोस्ट.येरला,ता. हिंगणघाट,जी.वर्धा