कोल्हापूर प्रतिनिधी
डॉक्टर्स डे निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. अजित लोकरे यांचा कोल्हापूरी फेटा व ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.
डॉक्टर लोकरे हे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे कार्यरत असून जिल्हातील विविध भागातून आलेल्या गोरगरीब रुग्णांना अडीअडचणी आल्यास वेळेची मर्यादा वगैरे औपचारिकता बाजूला ठेऊन सातत्याने सेवा हा भाव असलेले संवेदनशील अधिकारी अशी ओळख कोल्हापूरकरांच्या तोंडी असलेले सामाजिक बांधिलकी जपलेल्या डॉकटरांचा गौरव संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज करण्यात आला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील व इतर सहकारी उपस्थित होते.