कंदलगाव ता .६ .
गुरु पोर्णिमा म्हणजे व्यास पोर्णिमा दिवशी ओम नमो स्तुते व्यास विशाल बुधे आशि प्रार्थना करुन प्रथम गुरुंना वंद करण्याची परंपरा आहे. आपले ज्यांच्या कडुन विद्या प्राप्त करतो .किंवा मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करत असतो. अशा गुरुंना मान देणे ते प्रत्येक शिष्याचे आद्यकर्तव्य असते .पौर्णिमा म्हणजे प्रकाश, गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहचवावा म्हणून गुरुंची प्रार्थना करण्याचा हाच तो सुंदर दिवस.
या उद्देशाने फिरंगोजी शिंदे व अनंतशांती संस्थेच्या वतीने लाखो विद्यार्थी घडवलेल्या अशा अनेक गुरुंचा सत्कार गुरु पौर्णिमा निमित्य करण्यात आला. गेली अनेक वर्षे मर्दानी कला जोपासत नव्या पिढीकडे सुपूर्द करत आजही वेळोवेळी या कलेसाठी योगदान देणाऱ्या वस्ताद आनंदराव पाटील, बाजीराव पाटील,पांडुरंग सासणे, संभाजी जाधव,संभाजी चव्हाण, यशवंत साळोखे या ज्येष्ठ गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक सुभाष पाटील, भगवानराव गुरव, वस्ताद प्रमोद पाटील, तुषार पाटील,लक्ष्मण जाधव,दशरथ जाधव, कृष्णात सरनाईक, किसन जाधव, विश्वजीत पाटील, सानिका पाटील, अनुज पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - गिरगाव येथे गुरु पौर्णिमानिमित्य जेष्ठांचा सत्कार करताना संस्थेचे सदस्य .