खेर्डा कांरजा येथील शेतक-यांचा यशस्वी प्रयोग
आरिफ पोपटे
करंजा लाड दि. 29
शेतक-यांची नेहमी शेती पिकत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. मात्र मेहनत करणा-या शेतक-यांला तोड नाही असे म्हणने वावगे ठरणार नाही. खेर्डा कारंजा येथील शेतकरी जमीर खान नजीर खान या शेतक-यांनी मेहनतीच्या भरवश्यावर एक एक्कर शेतात तालुका कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने एक एक्कर शेतात निर्सरी करून भाजीपालाची रोपे घेउन अवघ्या तिन दोन महीण्यात 3 लाखाचे उत्पन्न काढणारे नदीम खान
संपुर्ण देशात कोरोना या संसर्गाने थैमान घातले असतांना शेतकरी वर्ग सुध्दा संकटात होता. अश्यातच कारंजा येथील युवा शेतकरी नदीम शेख नजीर शेख यांनी कृषी विभाग कारंजा कार्यालयाची संपर्क साधून एकात्मिक फलोत्पादन विभाग कडून 10 लाख कृषी विभागाचे व 10 स्वताचे भाग भांडवल गुतंवणुक करून 20 लाखाचे 100 बाय 40 चैरस फुट ग्रिन सेड उभारून दोन महीण्याआगोदर बिज उत्पादन करण्याच्या निर्णय घेतला.
या ग्रिन सेड मध्ये आतापर्यंत शिमला मिरची, साधी मिरची, बारीक मिरची, फुलगोबी, पानगोबी, टमाटे, वाके आदी पिकांचे रोपे या ठिकाणी घेण्यात असून आतापर्यंत यामधून अवघ्या दोन महीण्यात पाच लाख रोपाची विक्री करण्यात आली. प्रती रोप हे एक रूपया प्रमाणे विकल्या जात आहे. शेतक-यांनी मेहनत व जिदद ठेवल्यास नक्कीच यशाचे शिखर गाठल्याशिवाय राहत नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नदिम शेख यांनी दिली.
शेती हा व्यवसाय प्रयोगशील असून जो पर्यंत आपण शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पिकात फेरबदल करीत नाही तो पर्यंत उल्पन्नात वाढ होत नाही. त्या बरोबर शेतीसाठी मेहनत व जिदद हे फार महत्वाचे आहे.
शेतकरी जमीर खान नजीर खान
भाजीपाल्याची चांगल्या दर्जाची रोपे तालुक्यातील शेतक-यांना अल्प दरात उपलब्ध होत आहे. कमी दिवसात जास्त उत्पन्न या माध्यमातून घेतल्या जात आहे. तसेच स्वतःची शेती सुध्दा की पाण्यात उत्पन्न काढून पिकवल्या जात आहे. या शेतक-यांच्या शेतीत नुकतीच भेट दिली असून त्या प्रयोगशील शेतकऱ्यांचे अभिनंदन असून अश्या प्रयोगासाठी शेतक-यांनी पुढे यावे.
तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके कारंजा