आरिफ पोपटे - कारंजा :
कारंजा तालुक्यातील शहा ग्रामपंचायतीने गावातील नालेसफाई कडे दुर्लक्ष केल्याने नालीचे पाणी हे लोकांच्या घरात शिरल्याची बाब समोर आली आहे सविस्तर माहिती अशी की शहा येथील ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 2 पूर्णवस्ती मध्ये चारशे ते पाचशे लोक राहतात. गेल्या पाच वर्षापासून या वार्ड कडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नालीमध्ये जागोजागी गाळ साचलेला आहे व बऱ्याच ठिकाणी नाली खचलेली आहे . ग्रामपंचायतीचे सदस्य सौ बेबी जीनवर तायडे यांनी वारंवार ग्रामपंचायतीच्या मिटिंग मध्ये यांनी नाली साफ सफाई व दुरुस्तीची मागणी केली होती. जर साफसफाई व नाली ची दुरुस्ती झाली नाही तर पावसाचे पाणी नाली बाहेर जाऊन घरांमध्ये शिरण्याची शक्यता होती पण सदस्याच्या मागणीकडे ग्रामपंचायतीने जाणून बुजून दुर्लक्ष केले व नालीचे कोणत्याही प्रकारचे काम केले नाही. काल आलेल्या पावसामुळे नालीचे पाणी हे घरांमध्ये शिरले व जागोजागी थांबले त्यामुळे गावकर्यांची नुकसान झाले व आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे