सैनिक टाकळी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी शिरोळ व ग्रामपंचायत टाकळी यांचे संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेती चर्चासत्र व क्रॉपसॅप अंतर्गत शेतकरी शेतीशाळा वर्गाचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात करणेत आले होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त सरपंच सौ हर्षदा पाटील या होत्या .
क्रॉपसॅप शेतीशाळा च्या माध्यमातून सुजय पाटील यांनी ऊस पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचन या विषयावर मार्गदर्शन केले ,तर एस .टी. पाटील यांनी गोठा व्यवस्थापन व स्वच्छ दूध निर्मिती या विषयी मार्गदर्शन केले .
कृषी संजीवनी सप्ताह च्या चर्चासत्रात कृषी पर्यवेक्षक प्रकाश वठारे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना , प्रधानमंत्री पीक विमा योजना , ठिबक सिंचन योजना बाबत सविस्तर माहिती दिली .तसेच कृषी सहाय्यक जयपाल बेरड यांनी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शेततळे तसेच कृषी विभागाकडील सर्व योजनांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमास उपसरपंच सुदर्शन भोसले ,पोलीस पाटील सुनीता पाटील , माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील , वाल्मिकी कोळी, सुशांत कोष्टी ,विद्याधर पाटील , माणिक पाटील , संभाजी पाटील , संजय पाटील,विलास काटकर, विलास बेरड यांचे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत विनोद पाटील यांनी, प्रास्ताविक विश्वास गुरव यांनी केले तर सूत्रसंचलन सागर भमाणे यांनी केले.