प्रतिनिधी आरिफ़ पोपटे.
कारंजाः
राज्यात कोरोना या अदृष्य विषाणुने थैमान घातले त्याच्या संसर्गामुळे मानवी जनजिवन विस्कळीत झाले अाहे या संकटाचा सामना महाराष्ट्रातील सर्वच नागरीक करीत अाहेत यात प्रामुख्याने जनतेच्या हितासाठी परिवहन व दळवळणाची अखंड सेवा देणार्या खाजगी बसचालक व इतर संबधीत कामगार असुरक्षीत झाले अाहे येणार्या काळात अापण बसचालक कंड्याक्टर व संबधीत कर्मचार्याच्या बाबतीत विचार व्हावा जसेकी सुरक्षेसंबधीत विमा सुरक्षा कवच संसर्गापासुन बचाव करण्यासाठी बसच्या कॅबीनला पारदर्शक प्लास्टिकचा पडदा व सॅनटायझरची व्यवस्था करणे बस मालकाना बंधनकारक करावे यासोबत सरकारचे अादेशावरुन स्थानीकांना कामात प्राधान्य मिळावे असे धोरण राबविण्याचे अादेश बस मालकाना द्दावे चालक व कंड्याक्टर जे अाधी होते तेच बसवर कामासाठी असावेत असे स्पष्ट अादेश देउन खाजगी बस चालकाची उपासमारी शासनाने थांबवावी बस कंपनी मालकाने बंदच्या काळात चालकाना पगार दिला नाही त्यामुळे ते कर्जबाजारी झालेत त्यांना मागील बंदच्या काळातील पगार द्दावा त्याकरीता शासनाने मध्यस्थी करावी अश्या प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्य खाजगी वाहतुक कामगार संघटना वाशीम यांनी जिल्हाधिकारी वाशीम अार टी ओ कार्यालय वाशीम स्थानीक अामदार पाटणी साहेब यांना दिले यावेळी संघटना अध्यक्ष योगेश भांडे उपाध्यक्ष अाकाश राठोड प्रशांत वरठी रामेश्वर वाडेकर सुभाष निगोट व इतर सदस्य हजर होते सुरक्षीत अंतर ठेउन त्यानी निवेदन दिले