गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील कामगार गावाकडे रवाना
गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता. १२
गोकुळ शिरगाव एमआयडीसीतील कोरोना मुळे स्वतःचा रोजगार गमावलेले व लॉक डाऊन च्या काळात आपल्या मूळ गावी परतण्याचा मार्ग बंद झालेले परप्रांतीय कामगार आता अधिकृत रित्या गावाकडे परतत आहेत. कणेरी वाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये वास्तव्यास असलेले परप्रांतीय कामगारांनी गावी जाण्यासाठी ग्रामपंचायतीकडे रीतसर अर्ज केले होते. अशा सर्व कामगारांना केएमटी बसद्वारे कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले असुन तिथून पुढे रेल्वेने हे कामगार आपापल्या गावी परतणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २० मार्च पासून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत बंद असल्याने या ठिकाणी बरेच परप्रांतीय कामगार काम करत होते. पण औद्योगिक वसाहत बंद झाल्याने या लोकांचा रोजगार गेल्यामुळे हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून धडपडत होते. आज त्यांना रीतसर ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरून ज्या मजुरांनी नोंद केली होती. यावेळी कणेरीवाडी येथील तलाठी इंद्रेकर, उपसरपंच अजित मोरे. शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोद.हिंदुराव कदम. सुरेश खोत. सुरेश वारके यावेळी आदि. मान्यवर उपस्थित होते.