Thursday, 7 May 2020

mh9 NEWS

जागतिक थँलेसेमिया दिन विशेष

८ मे जागतिक थँलेसेमिया दिन विशेष .
प्रतिनिधी- प्रकाश पाटील 
  थँलेसेमिया निर्मूलन असोसिएशन कोल्हापूर व रक्तदाता कोल्हापूर .गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरातील  तरूणांनी एकञ येत कोल्हापूर रक्तदाता हा ग्रुप चालू करून त्या द्वारे कित्येक गरीब व गरजू रुग्णांना रक्ताची मदत केली . हे काम म्हणावं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं संघर्षमय प्रवास करत हा ग्रुप आता मोठ्ठा झाला आहे .
    कित्येक संकटावर मात करून  फौजी रोहीत कदम  यांच्या नेतृत्वाखाली  रक्तदाता कोल्हापूर ही सेना  ३ वर्षापुर्वी  एका टप्प्यावर येवून पोहचली तिथे असे दिसले कित्येक असे रुग्ण कि ज्यांना १५ ते २०दिवसांनी रक्त नाही चढवलं तर मृत्यू दारात उभा असतो .कधीही न पाहीलेलं महाभयंकर आजाराचं स्वरूप जीवघेणं आहे त्याला थॅलेसेमिया असं म्हणतात .
    आता त्याचा अभ्यास चालू झाला तसेच त्याच्या निर्मुलनाचा आमचा पुढला प्रवास त्यालाही आता २ वर्षे पुर्ण होत आहेत .  राजकुमार राठोड  , जयराम नाईक , रोहीत गुट्टे , थॅलेसेमिया निर्मुलन असो . कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष   रोहीत कदम , संस्थेचे अध्यक्ष  अनिल व्हटकर, उपाध्यक्ष रणजित जाधव, सचिव अमोल निल्ले , खजानिस सौ रिना तुरे ,ऐश्वर्या मुनींश्वर,राहुल गोंदिल , अभिजित बुधले, गोपाळ कुंभार,यासर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि टिमच्या धडपडीमुळे थॅलेसेमिया निर्मुलन असोसिएशन  मोलाचं काम करत आहे या कामाला जोड आहे ती कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स संघटना व या संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ. नेत्रदीपा पाटील व त्यांचे पदाधीकारी तसेच  कोल्हापूरातील समस्त रक्तदाता बंधू भगिनींची .थॅलेसेमिया निर्मुलनाचे हे कार्य आत्ताच्या कोवीड १९ च्या परिस्थितीतीही नियोजनबद्द  आणि शिस्तबद्दपणे चालू आहे ,  असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी २२ मार्च पासूनच सर्व थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना संपर्क करून त्यांना रक्त घेण्यासाठी येणारी अडचण येवू नये या साठी प्रयत्न करत आहे . तसेच संबंधीत आजारास लागणारी औषधे व  लागलेच तर रक्ताची व्यवस्था पण केली जाते . या कामी सि पी आर व इतर काही खाजगी ब्लड बँकाही  मदत करत आहेत. 
       याची गरज तसेच व्याप्ति समजून घेण्यासाठी  आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला आणि  परिवाराला या आजरापासून कसे वाचवावे यासाठी संस्थेचे प्रबोधन कार्यक्रम चालू असतात .

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :