गडमुडशिंगी गौतम बुद्ध जयंती घरोघरी साजरी;
सामूहिक जयंती उत्सव आला फाटा
गांधीनगर:प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
सामूहिक पद्धतीने गौतम बुद्ध जयंती साजरी न करता यावर्षी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रमाणेच तथागत गौतम बुद्धांची जयंती साजरी केली जात आहे. प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९. वी जयंती सुंपर्ण देश आणि विदेशातील भिम अनुयायांनी घरी साजरी करुन बाबासाहेबांना अभिवादन केले व एक आदर्श निर्माण केला. त्याचप्रमाणे ७.मे रोजी विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांची जयंती होत आहे. ही जयंती सुद्धा कोरोनावर मात करण्यासाठी समस्त बुद्ध समाज गडमुडशिगी. घरोघरी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करून व अभिवादन करून जयंती उत्साहात साजरी केली.
लाॅकडाऊन १७.मे पर्यंत वाढवण्यात आले आहे आणि सर्वच धार्मिक कार्यक्रमाच्या वर बंदी आहे त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि सरकारने केलेल्या आवाहनास सहकार्य करण्यासाठी बुद्ध पौर्णिमा बुद्ध जयंती सर्वांनी घरीच राहून उत्साहात साजरी केली.
त्याचबरोबर घराच्या अंगणामध्ये वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे करवीर तालुका अध्यक्ष सम्राट गोंधळी यांच्या घरी
तथागत गौतम बुद्ध प्रतिमेचे पूजन करताना
सम्राट गोंधळी, संदिप शिंदे, भिमराव गोंधळी [सामाजिक कार्यकर्ते] ,सुनील डोणे , प्रल्हाद गोंधळी, संदीप कांबळे, नितीन कांबळे, संदिप गोंधळी, उपस्थित होते.