मातृभक्त सौ . सुजाता सुर्यवंशी यांच्या आई हौसाबाई बद्दलच्या भावना ..
( १० मे मातृदिन विशेष )
प्रतिनिधी - प्रकाश पाटील .
मातृदिनाच्या आगदी आठवडाभर आधीच त्या मातृदिनाच्या तयारीला लागल्या होत्या . स्वत: शिक्षक असूनही भावना कशा व्यक्त कराव्या हे त्यांना सुचत नव्हते . त्यांच लग्न झाले पासून आईच्या शिदोरीतील संस्कारांचा साठा अजूनही संपलेला नसल्याने सौ . सुजाता अनिल सुर्यवंशी रा . कदमवाडी यांनी आपल्या आई विषयी प्रकट केलेल्या भावना ...
सध्या त्या राजेंद्रनगर येथील ज्ञानदिप विद्यामंदिर येथे शिक्षिका असून त्यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत अनेक अनुभव पाहिले असून ज्या -ज्यावेळी संकट येईल त्यावेळी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे ती त्यांची आई हौसाबाई .
पहिल्यांदा लेक , बहिण , नणंद , बायको , सुन , भावजय आणि मग आई अशी नाती सांभाळताना अनेकांशी प्रेमाचे तर कधी वादाचे प्रसंग आले . पण आई हे नाते सांभाळताना या नात्यामध्ये कधीच वाद , द्वेष निर्माण झाला नाही . खरोबर आई हे नातेच असे आहे कि त्यामध्ये फक्त प्रेम , माया , ममता , लाड आणि आपूलकीच्या शिदोरीचा भरणा आहे . वडिल शामराव , भाऊ संजय , बहिण मनिषा यांचे बरोबर अधीमधी होणारे वाद आणि कधी भांडणे यामुळे मी नाराज असायची पण माझी आई हे सर्व पाहून मला जवळ घेऊन लाडाने चार शब्द सांगायची .
माझे लग्न झाले पासून जशी मी सासरी आले तेव्हांपासून माझ्या पतीची साथ अखंडपणे तशीच आहे . त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे जीवनात अनेक परीक्षेत मी सहज पास झाले . पण प्रत्येक वेळी माझे पतीसुद्धा आई -बाबांचा सल्ला घेऊ असेच मला सुचवत असायचेत .
आई हि आईच असते तीच्या जवळचा मायेचा झरा आयुष्यात कधीच आटत नाही तिच्या संस्काराची जाणीव राखत आज जी मी खंबीरपणे उभी आहे . या मागे तिने दिलेली शिकवण आहे . अशी भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलून दाखविली .