आरोग्य सल्ला MH9 LIVE NEWS
तुळशीच्या गुणांबद्दल माहीत असूनही आपण तिचा उपयोग हवा तेवढा करत नाही. तुम्हीही ऐकून हैराण व्हाल की, तुळशीमध्ये (Basil) पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिऱ्यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्त्व आढळतात. जी अनेक आजारांना रोखून त्यांचा समूश नाश करण्याची ताकद ठेवतात. यामुळेच अनेक आजारांवरील औषधांमध्ये तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळस ही शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य उपचारासाठी फायदेशीर आहे. या पानाचं विशेष म्हणजे ही व्यक्तीच्या प्रकृतीनुसार काम करते. तुळशीमधील बहुगुणांमुळे फक्त तुळशीची पानंच नाहीतर याचं खोड, फूल, बिया या भागांचाही आयुर्वेद आणि नेचरोपथीमध्ये उपचारांसाठी वापर केला जातो. कॅन्सरसारखा दुर्धर रोग असो वा सर्दी-खोकला तुळशीचा वापर हा अनेक शतकांपासून केला जात आहे. म्हणूनच तुळशीला औषधांची राणी - हर्बल क्वीन सुद्धा म्हणतात.
तुळशीच्या पानांना खाण्याचा योग्य मार्ग म्हणजे ती पानं गिळणं किंवा त्याचा रस, काढा बनवून पिणं. चहा किंवा इतर प्रकारे पाण्यात तुळशीची पान उकळून पिता येतात. पण चूकूनही तुळशीची पान चावू नये. याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे तुळस ही पूजनीय आहे आणि दुसरं म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा धातूची तत्त्व आढळतात, जी पानं चावल्याने दातांवर लागू शकतात. पाऱ्यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पान चावण्याऐवजी ती गिळावी किंवा चघळावी. यामुळे अनेक प्रकारच्या रोगांमध्ये फायदा होतो.
आयुर्वेदामध्ये तुळशीला संजीवनी बूटी असं मानलं जातं. कारण या रोपात असे अनेक गुण आहेत ज्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते. तुळशीचं रोपं हे फक्त आरोग्यासाठीच नाहीतर घरालाही वाईट नजरेपासून वाचवतं असं म्हणतात कदाचित याच विचारामुळे पूर्वी प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन असायचं.
याबरोबरच तुळस हि त्याग आणि समर्पण दर्शवणारी वनस्पती आहे. पुराणात श्री कृष्णाची सुवर्णतुला केल्याची कथा आहे. त्यावेळी खूप सोने एका पारड्यात ठेवले. दुसऱ्या पारड्यात भगवान श्री कृष्ण बसले. तराजू समपातळीवर येईना, तेव्हा रुक्मिणीने तुळशीपत्र मनोभावे अर्पण केले आणि श्री कृष्णाची सुवर्णतुला झली. आपण कोणाला हि दक्षिणा देताना त्यावर तुळशीपत्र ठेवून आपली त्यागाची भावनाच दर्शवतो.
तुळस ही औषधी वनस्पती आहे. ती आपल्या उच्छ्वासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध होते. तुळस ही कफ नाशक व पाचक आहे. सर्दी, पडसे, कफ खोकला, दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे .तुळशीची पाने, आले व गुळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो.चहा, कॉफी ऐवजी तो पिणे अधिक चांगले. तुळशीची पाने जेवल्यावर खाल्यास पचन चांगले होते. तुळसी रस कायम प्राशन केल्यास मूत्रपिंडाची क्षमता वाढते. रक्तातील कोलेस्ट्रोल कमी होते. कोलायटीस , अंग दुखणे, सर्दी पडसे, पांढरे कडे, मेदवृद्धी,डोकेदुखी यावर तुळस गुणकारी औषध आहे. उचकी लागल्यास तुळशीची पाने खावीत. स्मरण शक्ती वाढण्यास तुळस उपयुक्त आहे. तुळशीच्या मंजिऱ्या म्हणजे तुळशीची फुले त्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. त्यात पाणी, दुध, साखर एकत्र करून प्यायल्यास लघवी स्वच्छ होते.
अर्थात इथे दिलेली माहिती ही फक्त प्राथमिक स्वरूपात असते. कोणत्याही प्रकारच्या औषधी उपयोगांसाठी आपल्या तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्या.
वरील माहिती कशी वाटली ते कॉमेंट मध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करा. चांगली माहिती सर्वांना मिळालीच पाहिजे.