राष्ट्रहितासाठी सध्या घरी राहणे हेच हिताचे आणि सुरक्षितेचे - निवृत्त न्यायाधीश मा .के .डी पाटील
अत्यंत कठीण काळात राष्ट्रहितासाठी सध्या घरी राहणे हेच हिताचे आणि सुरक्षितेचे आहे असे प्रतिपादन मा .निवृत्त न्यायधिश के .डी पाटील यांच्या वतीने करण्यात आले. ते सफाई कामगार व पोलीस बांधव यांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. पोलीस बांधव गौरव चौगले ,संभाजी रणदिवे , सेवापरिचारिक गणेश जगदाळे , सौ.जगदाळे आरोग्य सेवक यांचा सत्कार निवृत्त जिल्हा न्यायाधीश मा .के .डी पाटील यांच्या हस्ते गृहपयोगी धान्यकिट देवून करण्यात आला. तसेच भागांतील आरोग्य निरीक्षक मा .नंदकुमार पाटील , मुकादम मा .प्रकाश लोंढे , कैलास लोट, सर्व सफाई कर्मचारी , शौचालय सफाई , घंटा गाडी सर्व कर्मचारी यांना फेटा , सानीटायझर व मास्क देण्यात आले यावेळी नगरसेवक अशोक जाधव, अँड जीवन पाटील , श्री राम सोसायटीचे माजी सभापती अर्जुन चौगले , विष्णू चौगले , प्रशांत पाटील माजी उपसभापती भगवान चौगले , ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील, शरद पाटील ,आनंदराव पाटील , प्रकाश जाधव , रमेश पाटील , पी एच .पाटील,विजय चौगले,शामराव जाधव , सुनिल पोवार , दिलीप चौगले , कृष्णात चौगले , सचिन लोंढे , उदय पाटील , आनंदा जाधव , चेतन चौगले , विशाल चौगले , नाना चव्हाण ,अनिल जाधव , विलास चौगले , बी.एस.चौगले , अभिजीत जाधव आदी उपस्थित होते .