विक्रमनगर येथे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - विद्युत कर्मचारी संघटनेची सामाजिक बांधिलकी
कोल्हापूर प्रतिनिधी
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना कष्टकरी कामगारांना रोजगार बंद आहे त्यांना दिलासा देण्यासाठी विद्युत कर्मचार्यांनी अन्नधान्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्यावतीने कोल्हापूर येथील विक्रमनगर मधील असंघटित, परप्रांतिय व ज्यांचे हातावर पोट आहे अशा कष्टकरी कामगारांना गहू,तांदूळ, तेल,तिखट या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, केन्द्रिय उपाध्यक्ष आर.एस.कांबळे, कोल्हापूर मंडल सचिव विजय मोरे तसेच सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले उदय नलवडे व धैर्यशील नलवडे, कोल्हापूर माविक पतसंस्था कर्मचारी सुकुमार कोठावळे, सुनिल म्हेत्री, विक्रम कांबळे हे उपस्थित होते.