लॉकडाउनमध्ये सर्व ठप्प असताना बळीराजाची
देशाला वाचवण्यासाठी धडपड - - - रयत क्रांती संघटना युवती प्रदेश अध्यक्ष प्रिया लोडम
ता 2 कारंजा प्रतिनिधि (m आरिफ पोपटे )।मद्यमवर्गीय आणि श्रीमंत शहरवाशी, मोठया हुद्यावरील नोकरीवाले गल्ल्यागोट पगारवाले एसीत बसून सरकारला सल्ला देणारे भारता पेक्षा जगाला सल्ला देणारे भारतीय अन्नदात्यापेक्षा जगाच्या राजकारणाची चिंता करणारे या सर्वांना कोरोनाने एक धडा शिकवला मदतीची गरज नाही अशी मिसाज मारणारेच आज सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे आहेत पूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना निसर्गाने त्यांना थोपटले तर त्यांचा आर्थिक कणा तुटला असे हेच लोक सांगताना दिसत आहेत ,मात्र शेतकऱ्यांना तर दरवर्षीच असे भयंकर प्रसंग येत असतात कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ, कधी अतीवूष्टी तर कधी पिकलं तर हमी भाव नसल्याने लुटल्या जातोय,
तरी तो येणारे संकटे सातत्याने झेलत असतो,
पुन्हा पेरणी करतो, कापणी करतो, नशिबाला दोष देऊन मुकाट्याने सहन करीत असतो
आणि हे इंडियन कर्जमुक्तीचा प्रश्न समोर आला की हेच उद्योजक शेतकऱ्यांना विरोध करीत असतात, मल्या व इतर कर्जबुडव्याचे पाय चाटणारे बॅँक अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांना शहाणपण शिकवीत असतात, व कर्जमुक्तीमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडणार असे उपदेश देतात आणि आज याचं बँकेनी उद्योजकासाठी तिजोरी रिकामी केली, हा शेतकऱ्यावर वर्षेनूवर्षे चालत आलेला अन्याय नाही का,
आज देश ठप्प असतांना फक्त देशाचा पोशिंदाच बळिराजा देशाला वाचवण्यासाठी धडपडत आहे, हे सूर्यप्रकाशासारखे खरे आहे, यालाच म्हणतात ""भीक नको पण कुत्रा आवर""
कारण कोरोनासारखे संकट असतांना सुद्धा फक्त शेतकरी उद्योग चालू आहे, अन्नधान्य पिकविणे चालू आहे हे फक्त शेतकरीच मुकाट्याने सहन करीत आहे, कारण ही सवय शेतकऱ्यांना जन्मताच लागलेली कीड आहे, त्यांना निसर्गाने लावलेली सवय आहे, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका तो खूप दयाळू आहे, मायेचा पाझर त्यांच्या डोळ्यात आहे, आज कोरोना संकटात आमची शेतकरी माऊली कामावर असलेल्या मजुरांची व शेजारच्या कुटुंबाची चूल पेटली का नाही ती पाहते व मगच स्वतःची चुल पेटविते ही रणरागिणी शेतकरी माऊली कुटूंबात सर्वांना बळ देते ,व अन्नधान्याची भाजील्याची दुधाची शहरी जनतेला पोहचविण्याची व्यवस्था सुद्धा लावीत असते,परंतु एवढया कार्यक्षमतेने काम करणाऱ्या बळीराजाची कोरोनाचे संकट सम्पताच शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आज घरात पडून असलेला शेतमाल बेभाव विकावा लागत आहे व कापसासारखे नगद पिकाला रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस बाजारपेठेतून वापस आणायची वेळ येत आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला प्रमाणे आमचं पांढरे सोने फेकायची वेळ येऊ नये म्हणून, आमदार खासदार यांनी आपापल्या जिल्यातील व तालुक्यातील कापूस केंद्रावर लक्ष द्यावे जेणेकरून सर्व कापूस उच्च दराने खरेदी करण्यासाठी मदत होईल, व शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल ,असे उद्गार त्यांनी व्यक्त केले.